वॉशिंग्टन – अमेरिकेत वॉशिंग्टन आणि ओरेगॉन भागांमध्ये सध्या पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे किमान डझनभर जणांचे मृत्यू झाले आहेत. वायव्येकडील भागात वाढत्या उकाड्यामुळे वीजेची मागणीही प्रचंड वाढली आहे.
परिणामी या भागातील वीजपुरवठा खंडीत करावा लागला होता. उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे सिएटल आणि पोर्टलॅन्ड भागात लागोपाठ दोन दिवस 100 अंश फॅरेनहाईट (37 अंश सेल्सियस) इतक्या तापमानाची नोंद झाली होती.
मंगळवारी त्यात थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र ओरलॅन्डमधील स्पोकॅने आणि इदाहो शहरांमधील तापमान वाढले आहे. तेथे तापमान 42 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते.
प्रचंड उष्णतेमुळे आतापर्यंत डझनभरजणांचा मृच्यू झाला आहे. त्यामध्ये सिएटल, वॉशिंग्टन, ग्वांटेमला आदी भागांमधील व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी विस्कोन्सीन येथील एका भाषणादरम्यान या उष्णतेच्या लाटेची दखल घेतली आहे.