“सचिनच्या जाहिरातीमुळेच सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला”; बच्चू कडूंनी आरोप करत दिला आंदोलनाचा इशारा

Bacchu Kadu On Sachin Tendulkar| माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षारक्षकाने काही दिवसांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा नाहीतर मुंबईतील त्याच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ऑनलाईन रमीच्या जाहिरातीवरुन गेल्या काही महिन्यांपासून भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यात मोठा वाद सुरु आहे. यातच आता सचिन तेंडुलकरचा सुरक्षारक्षक प्रकाश कापडे याने ऑनलाईन रमीच्या व्यसानमुळे आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. Bacchu Kadu On Sachin Tendulkar|
“जो अंगरक्षक सचिन तेंडुलकर यांचे रक्षण करत होता. त्यांना इजा होऊ नये म्हणून काम करत होता. त्यालाच सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला. हे दुर्दैवी आहे, सचिन तेंडुलकरने याची जबाबदारी घेतली पाहिजे. तसेच सचिनने भारतरत्न परत करावा,” अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे. Bacchu Kadu On Sachin Tendulkar|
सविस्तर माहिती अशी आहे की, सचिन तेंडुलकरचा सुरक्षारक्षक प्रकाश कापडे याने काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मूळ गावी आत्महत्या केली होती. प्रकाश कापडे हे गेल्या १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत काम करत होते. त्यांनी याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांचे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते सचिन तेंडुलकरचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. यानंतर आता बच्चू कडू यांनी ऑनलाईन रमीमुळे आलेल्या कर्जबाजारीपणामुळे कापडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा:
बिहारच्या सारणमध्ये मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात एक ठार, दोन जखमी, ४८ तास ‘इंटरनेट बंद’





