पॅरिस : रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले असून या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़ आहेत. दरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ शेअर होऊ लागले. हतबल झालेल्या युक्रेनमधील नागरिकांचे फोटो, व्हिडीओ पाहून जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व तणावाच्या परिस्थितीमध्ये असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षित ठिकाणी आपल्या कुटुंबाला सोडल्यानंतर मुलीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडताना दिसत आहे.
⚠️#BREAKING | A father who sent his family to a safe zone bid farewell to his little girl and stayed behind to fight …
#Ukraine #Ukraina #Russia #Putin #WWIII #worldwar3 #UkraineRussie #RussiaUkraineConflict #RussiaInvadedUkraine pic.twitter.com/vHGaCh6Z2i
— New News EU (@Newnews_eu) February 24, 2022
नागरिकांना आसरा घेण्यासाठी ही सुरक्षित ठिकाणे तयार करण्यात आली आहेत. कुटुंबाला तिथे सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचे असल्याने त्याला अश्रू आवरत नव्हते. एका या वृत्तसंस्थेने हे ट्वीट शेअर केले आहे.
आठ वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतलेल्या रशियाने काही महिन्यांपासून युक्रेनच्या सीमेवर सैन्याचा मोठा फौजफाटा तैनात केला. गेल्या काही दिवसांत सीमेवरील हालचाली वाढल्याने युक्रेनला आपल्या प्रभावक्षेत्रात कायम ठेवण्यासाठी रशिया आक्रमणाचा मार्ग निवडेल, ही भीती खरी ठरवत अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केली.
गेले अनेक आठवडे युक्रेनवर आक्रमणाचा विचार नसल्याचा पुनरूच्चार करणाऱ्या पुतिन यांनी अचानक दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा दावा करत कारवाईचे जोरदार समर्थन केले. युक्रेनचे ‘निर्लष्करीकरण’ करण्यात येईल, असा दावा पुतिन यांनी यावेळी केला.