बीड – आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक नागरगोजेचा शोध घेत होते. पण तो पथकाला गुंगारा देऊन फरार होत होता. अखेर बुधवारी त्याचा सुगावा लागताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात त्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी, तसेच म्हाडा आणि त्यानंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी 35 जणांना अटक केली आहे. या सर्वांचा पेपेरफुटी प्रकरणात संबंध असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.