देवपुजा करून ‘त्याने’ घेतला गळफास

पिंपरी : शेतातील देवाची पुजा करून तसेच देवाची गाणी लावून एकाने गळफास घेतला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) सकाळी घडली.
संदीप चिनकु आल्हाट (वय 43, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे गळफास घेतलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

मयत संदीप यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी निघाले. शेतात जाऊन त्यांनी मुंजोबा देवाची पुजा केली.

त्यानंतर मोबाईलवर देवाची गाणी लावत जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला. सकाळी दहा वाजताच्या सुमारास संदीप यांचा भाऊ शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत संदीप यांच्या मागे आई, वडिल, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.