नगर: दूध संघाचा टेंपो घेऊन जाणाऱ्यास दुचाकीस्वाराने अडवून अपघात केल्याचे सांगून 17 हजारांची रोख रक्कम हिसकावून नेली. नगर-मनमाड महामार्गावरील पद्मावती चौकाजवळ विषाल मार्बलसमोर रविवारी (दि.31) ही घटना घडली. अण्णासाहेब भीमराव साबळे (रा. कान्हेगाव, ता. कोपरगाव) हे त्यांच्याबरोबरचे कामगार सुरेश वाव्हळ यांच्यासोबत गोदावरी दूध सघाचा टेंपो घेऊन नगर-मनमाड महामार्गावर जात असताना पद्मावती चौकाजवळ विना नंबरच्या दुचाकीस्वारांनी टेंपो अडविला. पाठिमागे आमच्या गाडीचा अपघात केलास, असे म्हणून त्याने चालक साबळे यांना चपराक मारली. त्यांच्यासोबतच कामगार वाव्हळ यांच्या खिशातून दोन हजार रूपयांची रोख रक्कम व गाडीच्या बॅगमधून 15 हजार 85 रूपये असे एकूण 17 हजार 85 रूपये बळजबरीने हिसकावून नेले.