खडकवासला – पानशेत रोडवरील आंबी फाट्याच्या आत रानवडी ता. वेल्हे हद्दीत किरकोळ वादातून पुण्याच्या युवकाचा लोखंडी सळईने निघृण खून करून पुरण्यात आला आसल्याची घटना बुधवारी (ता.१८) रोजी उघडकीस आली. आरोपींनी फिल्मी स्टाईलने घरासाठी घेतलेल्या खोल खड्ड्यात मृतदेह पुरला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती.
विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८ राहणार कन्या शाळेजवळ विजय लाॅज बिल्डिंग, आप्पा बळवंत चौक पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीसांनी आरोपी नितीन रामभाऊ निवंगुणे व विजय दत्तात्रय निवंगुणे दोघे रा.आंबी (ता. हवेली) यांना अटक केली आहे.
या प्रकरणी पानशेत पोलीस चौकीचे पोलीस नाईक अजय कुमार शिंदे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फीर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहीती मिळताच हवेली विभागाचे विभागीय पोलीस आधिकारी भाऊसाहेब ढोले, वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी वेल्हे तालुका निवासी तहसीलदार सूर्यकांत कापडे व पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत पोलीसांनी सांगितले की पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांना रानवडी येथे आरोपी नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांनी एका व्यक्तीचा खुन करून मृतदेह नितीन निवंगुणे यांच्या शेतात टाकला आहे.आशी माहीती खब-याकडून मिळताच वेल्हे पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश कदम रानवडी (पानशेत ) येथे तातडीने दाखल झाले .
नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले .पंरतु दोघांनी उडवा उडविची उत्तरे दिली, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दोघांना विश्वासात घेतले. विचारपुस केली असता नितीन निवंगुणे यांने गुन्हा केल्याची कबुली दिली. नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी खोल पाया घेतला होता, त्या खोल खड्यात विजय काळोखे यांचा मृतदेह पुरून ठेवला होता.