Amit Shah on Voting । लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर फक्त दोन टप्पे उरले आहेत. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर मतदान सुरू झाले आहे. दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आजच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी मतदारांना आवाहन केले आहे.
अमित शाह म्हणले, एका मताच्या जोरावर...Amit Shah on Voting ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून सांगितले की, आज उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. मी या राज्यांतील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करतो. तुमच्या एका मताच्या जोरावर असे सरकार बनवा, जे घर, गॅस, वीज, शौचालय, मोफत उपचार या सुविधा देऊन प्रत्येक गरीबाला सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क मिळवून देण्याचे काम करेल,” असे त्यांनी म्हटले.
I appeal to all the people who are going to cast their votes in the fifth phase of the polling today to elect a visionary leadership that will continue to enhance the pride of the nation. Ensure that every vote is directed towards forming a government that will continue to build…
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) May 20, 2024
8 राज्यांतील 49 जागांवर मतदान Amit Shah on Voting ।
देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. एकूण सात टप्प्यांमधील सर्वांत कमी मतदारसंघ याच टप्प्यात आहेत.