हडपसर – गेली अनेक दिवस रखडलेले रवीपार्क काळेपडळजवळील भुयारी मार्गाचे आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होणार आहे. दि. 15 फेब्रुवारीपर्यंत हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे माजी आमदार व भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी सांगितले.
महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व या कामाचे प्रकल्पप्रमुख श्रीनिवास बोनाला, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसमवेत या रखडलेल्या कामाची माजी आमदार टिळेकर यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. “या भुयारी मार्गाच्या राहिलेल्या कामाची निविदा काढली असून, संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश दिले आहेत,’ असे प्रकल्पप्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.
तर “भुयारी मार्गाच्या या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
यावेळी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रसन्न जगताप, नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेविका उज्वला जंगले, नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेवक संजय घुले, माजी नगरसेविका विजया वाडकर, माजी नगरसेवक सुनील बनकर, भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, सुभाष जंगले, गणेश घुले, प्रवीण तुपे, दादा कोद्रे, जीवन जाधव, इम्तियाज मोमीन, योगेश सूर्यवंशी, हनुमंत घुले, पोपट वाडकर, संजय सातव,विकास भुजबळ, शोभा लगड आदींसह नागरिक उपस्थित होते.
सय्यद नगरजवळील भुयारी मार्ग सुरू असून, हा दुसरा भुयारी मार्ग सुरू केल्याने या परिसरातील नागरिकांची वाहतूकची चांगली सोय होणार आहे. यामुळे सय्यदनगर, ससाणेनगर रेल्वे गेटवर होणाऱ्या नियोजित भुयारी मार्गासाठी हे पर्यायी रस्ते असतील.
योगेश टिळेकर, माजी आमदार, हडपसर