भाजपचे १२ आमदार माझ्या संपर्कात

भाजपच्या माजी आमदाराचा गैप्यस्फ़ोट 

मुंबई –  भाजपचे बंडखोर माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी माझी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. माझी फसवणूक झाल्यामुळेच मी राष्ट्रवादी प्रवेश करत आहे असं अनिल गोटे यांनी सांगितलं.

भाजपचे बारा आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा अनिल गोटे यांनी केला आहे. शरद पवार यांनी परवानगी दिली तर, ते सर्व आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली.

शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणावरुन वाद झाला होता. हा वाद विसरुन  अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे धुळ्यात भाजपला खिंडार पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.