नवी दिल्ली – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (Hd kumarswami ) यांनी आपल्या घरासाठी वीज चोरी केल्याची बाब उघडकीला आली असून त्यांनी या प्रकरणी 68 हजार 526 रूपयांचा दंड वीज कंपनीला भरला आहे. मात्र कुमारस्वामी यांनी दंडाच्या रकमेची गणना करण्याच्या पद्धतीचा निषेध केला आहे. (Karnataka politics)
आपल्या कडून अवास्तव दंड वसुल करण्यात आल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या कुमारस्वामी यांच्याकडून वीज चोरीचा प्रकार सुरू होता ते उघड झाल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांचे वडिल एच.डी. देवेगोैडा हे देशाचे माजी पंतप्रधान आहेत हे विषेश.(kumarswami Paid Fine)
हा प्रकार उघड झाल्यानंतर कुमारस्वामी यांनी आता त्रागा सुरू केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी माझ्यावर ही राजकीय द्वेषातून कारवाई केली आहे. ते म्हणाले की माझ्या घरात जी बेकायदेशीर वीज घेतली गेली ती माझ्या घरी काम करणाऱ्या वीज कंत्राटदाराने माझ्या संमती शिवाय परस्पर घेतली आहे. दिवाळीत माझ्या घरी जे लायटिंग केले गेले त्यासाठी केवळ टेस्टींगसाठी म्हणून त्याने हे बेकायदेशीर वीज कनेक्शन घेतले असे कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे. (kumarswami electricity theft)
दरम्यान कुमारस्वामी यांच्यावर या निमीत्ताने निशाणा साधताना कॉंग्रेसने म्हटले की, “जगातील एकमेव प्रामाणिक व्यक्ती एच.डी. कुमारस्वामी यांचे जेपी नगर येथील निवासस्थान विजेच्या खांबावरून घेण्यात आलेल्या बेकायदेशीर वीज कनेक्शने उजळले होते. माजी मुख्यमंत्र्यांना गरीबीमुळे वीजचोरी करण्याची वेळ येणे ही शोकांतिका आहे अशी टोलेबाजी काँग्रेसकडून करण्यात आली होती.