मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर काही वर्षांत आपल्या जबरदस्त अभिनयाने सतत प्रसिद्धी मिळवित आहे. एवढेच नव्हे, तर तिने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स ओलांडल्यामुळे सोशल मीडियावर एक नवीन कामगिरी केली आहे.
View this post on Instagram
आज 3 मार्च रोजी म्हणजेच, श्रद्धा कपूरचा वाढदिवस आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत श्रद्धाने रसिकांच्या मनावर राज्य केलंय. बॉलिवूडचे प्रसिद्ध व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धाने बॉलिवूडमध्ये गेल्या 11 वर्षात अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री श्रद्धा कपूरने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या “आशिकी-2′ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात श्रद्धा बरोबर अभिनेता आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसून आला. “आशिकी-2′ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाण्यांनी सगळ्यांनाचा वेड लावलं.
View this post on Instagram
‘आशिकी-2’, ‘एक व्हिलन’ या चित्रपटानंतर श्रद्धाला अनेक मोठया सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. यानंतर तिने ‘हैदर’, ‘रॉक ऑन’ ‘बागी’, ‘एबीसीडी-2’, ‘स्त्री’ अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय गेल्या वर्षी सुपरस्टार प्रभासच्या “साहो’ या चित्रपटाद्वारे तिने दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले होते. यामध्ये तिचा ऍक्शन अवतार पाहायला मिळाला.
View this post on Instagram