#HBD: सूर सम्राज्ञी ‘आशा दीदी’

मुंबई – सूर सम्राज्ञी ‘आशा भोसले’ यांचा आज वाढदिवस. आपल्या सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवत असलेला आशा दी यांच्या जादुई आवाजने हजारो गाण्यांना आवाज दिला आहे. आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी 16 हजारांवर अधिक गाणी गायली.  मात्र, आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली मध्ये झाला. दीदींचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. वयाच्या 10व्या वर्षी दीदींनी गायनाला सुरुवात केली आणि तेव्हा पासून आजतागायत आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.