वायलुकू (हवाई) :- हवाईतील लहाइया येथे भडकलेल्या आगीमध्ये किमान 36 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीमुळे हजारो नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
ही आग हवाई बेटावरील माउइ येथे अचानक लागली होती.
आगीमध्ये अनेक कार जळून गेल्या आहेत. रात्रीच्यावेळी लागलेल्या आगीमुळे नागरिकांना सुरक्षिततेसाठी चक्क समुद्रामध्ये उडी मारून आपला जीव वाचवावा लागला. अशा 14 जणांना कोस्टगार्डने वाचवले आहे.
माउइ येथील प्रशासनाने आपल्या वेबसाइटवर मृतांच्या आकड्याशिवाय मृतांशी संबंधित कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. या आगीमध्ये किमान 271 इमारतींचे नुकसान झाले किंवा या इमारती पूर्णपणे जळून गेल्या आहेत. आगीमुळे डझनभर लोक जखमी झाले असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.
लहाइना येथील रहिवाशांना बुधवारी रात्रभर या आगीपासून बचाव करण्याची शर्थ करावी लागली होती. डोरा या वादळाच्या वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरली होती. आगीमुळे सुमारे 14 हजार 500 घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर काही भागांमधील मोबाइल आणि टेलिफोन सेवाही बंद पडली आहे.
विमानसेवाही बंद केली गेल्यामुळे 2 हजार प्रवाशांना विमानतळांवरच मुक्काम करावा लागला. ही आग नक्की कशामुळे लागली, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. आगीची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.