मुंबई – ‘मर्दानी’ चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज ‘मर्दानी २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेत्री ‘राणी मुखर्जी’ पोलिसाच्या भूमिकेत असून, या मध्ये राणीचा करारी लूक पाहायला मिळतो.
दरम्यान, हा चित्रपट महिलांवरील अत्याचारावर भाष्य करणारा आहे. कोटा शहरात एका तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केला गेलेला बलात्कार आणि तिचा खून या धक्कादायक घटनेने ट्रेलर सुरू होतो. ‘मर्दानी २’चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण राजस्थान मध्ये झालं असून, येत्या १३ डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात येणार आहे.
She’s back. She’s unstoppable. She is Shivani Shivaji Roy. The chase begins again. #Mardaani2Trailer OUT NOW. #RaniMukerji #GopiPuthran @Mardaani2 #SheWontStop pic.twitter.com/qTDtkV6im2
— Yash Raj Films (@yrf) November 14, 2019