मुंबई- ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वहिनीसाहेब म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी गोड बातमी आहे. लवकरच तिच्याकडे चिमुकला पाहूणा येणार आहेत.आपण आई होणार असल्याची ही आनंदवार्ता धनश्रीनेच दिली होती. या संदर्भातील माहिती तिने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. तिचा नवरा दुर्वेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट आहे, असंही तिनं लिहिलं आहे.
धनश्री सोशल मिडीयावर ह्या काळातसुध्दा प्रचंड सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच तिने आपल्या डोहाळे जेवणाचे अप्रतिम फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
बर्याच लोकांना हा व्हिडिओ आवडला. आम्ही नुकतीच सर्व खबरदारीसह व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ शूट करण्यामध्ये काही लोकांची टीम होती. या शूटसाठी मेकअप व्यक्तीपासून कॅमेरामॅनपर्यंतच्या सर्व टीमची कोरोना चाचणी झाली आणि त्यानंतर शूटमध्ये भाग घेतला, असं भाग्यश्रीने सांगितलं.
View this post on Instagram