गुवाहाटी – आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगई यांचे गुवाहाटी येथे आज उपचारांदरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोरोना बाधा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवल्याने त्यांचा कोरोनाविरोधातील लढा अयशस्वी ठरला.
गोगई यांच्या निधनाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी माहिती दिली. तत्पूर्वी, आज सकाळी गोगई यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द दिब्रुगढ येथून ते गुवाहाटी येथे निघाले होते.
Former Assam CM and Congress leader Tarun Gogoi ( in file photo) passes away in Guwahati, announces state health minister Himanta Biswa Sarma pic.twitter.com/UBn3AS2CEF
— ANI (@ANI) November 23, 2020