हाथरस प्रकरण : “भाजपाच्या महिला आघाडीला लाज राहिली आहे की नाही?”

हाथरस प्रकरणातील 'त्या' शंकेवरून संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली – हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर मध्यरात्री करण्यात आलेले अंत्यसंस्कार, विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापासून मज्जाव या सर्वांमुळे उत्तर प्रदेश पोलीस व सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांकडून आता हाथरस प्रकरण सामूहिक बलात्काराचे नसून ऑनर किलिंगचे असल्याचा दावा करण्यात येतोय. पीडितेच्या खून तिच्याच घरच्यांनी केल्याचा दावा काही भाजप नेत्यांनी केला आहे. याबाबत ट्विट करताना भाजपच्या आयटी सेलच्या राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या प्रीती गांधी यांनी देखील हीच शंका व्यक्त केली होती.

दरम्यान, प्रीती गांधी यांनी व्यक्त केलेल्या या शंकेवरून वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गांधी यांचे ट्विट रिट्विट करत त्यांनी, भाजपच्या महिलांना भाजपाच्या महिलांना लाज राहिली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे भाजप आयटी सेल राष्ट्रीय प्रमुख प्रीती गांधींचे ट्विट?

हाथरस प्रकरणात ऑनर किलिंगचा संशय व्यक्त करत प्रीती गांधी यांनी, “हाथरस पीडिता व संशयित आरोपी यांच्यात ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान १०० कॉल्स करण्यात आले आहेत. त्यामुळे जे प्रकरण दलित अत्याचार अथवा सामूहिक बलात्कार म्हणून तापवलं जातंय ते ऑनर किलिंगही असू शकत.”


प्रशांत भूषण यांची संतप्त प्रतिक्रिया

“अपेक्षेप्रमाणे भाजपची महिला आघाडी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाला ऑनर किलिंग म्हणत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनीच तिला मारल्याचा आरोप करत आहे. भाजपच्या महिलांना भाजपाच्या महिलांना लाज राहिली नाहीय का?” अशी प्रतिक्रिया भूषण यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.