मुंबई- अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ पुरवठा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सगळ्यांचं पून्हा लक्ष केंद्रीत झालं आहे. मात्र रियाची अनेकदा चौकशी झाली. त्या चौकशीतून काही मुद्दे समोर आले. मात्र आता कोणत्या कारणामुळे तिला जामीन मिळाला… ?
रिया चक्रवर्ती ड्रग्ज डीलर चेनचा हिस्सा नाही. रियाला सर्वात प्रथम कोर्टसमोर हजर करण्यात आलं तेव्हा NCB ने तिचा ताबा मागितला नव्हता. याचा अर्थ ncb तिच्या चौकशीबाबत समाधानी होती आणि तिने सहकार्य केलं होतं. सुशांत सिंह राजपूत हा स्वत:च्या घरात राहत होता आणि स्वत:च्या गरजांसाठी खर्च करत होता. त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा नोंद नव्हता. त्यामुळं रिया चक्रवर्तीने त्याला आश्रय दिला आणि अमली पदार्थ मिळवण्यासाठी पैशांचा पुरवठा केला, असे म्हणता येणार नाही
रियाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसंच अमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीतही ती सहभागी असल्याचं दिसत नाही. रिया ड्रग्ज सिडिकेटची सक्रिय सदस्य आहे याबाबत NCB पुरावे देऊ न शकल्यानं रियाला जामीन मिळाला. NCBनं ज्या कलमांतर्गत कारवाई केली ती कलम कोर्टात NCB सिद्ध करू शकले नाहीत.