इंदापूर (नीलकंठ मोहिते ) : तुम्हाला स्मारकाच्या फरशा काढण्यासाठी कोणी परवानगी दिली.असा सवाल स्मारकाच्या फरशा काढणाऱ्या ठेकेदाराला जागेवर जाऊन,शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत राज्याचे माजीमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला.
इंदापूर शहरातील पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर शासनाच्या निधीतून मालोजीराजे स्मारक अद्यावत उभारले होते.परंतु आता या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणाचीही परवानगी न घेता संबंधित ठेकेदाराने येथील फरश्या काढल्या आहेत.त्यामुळे इंदापूरकर नागरिक संतप्त झाले असून,थेट त्या चौकात येऊन ठेकेदार अधिकारी यांना नागरिकांनी रविवारी (ता.२१ ) जाब विचारला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी तुमच्याकडे हे स्मारक पाडण्याची ऑर्डर आहे का ? ही परमिशन तुम्हाला कोणी दिली ? असा सवाल संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांना हर्षवर्धन पाटील यांनी विचारला.तुम्हाला जे रस्ते करायचे आहेत ते करावे परंतु स्मारकाला हात लावू नका आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलून घेतो.जसे स्मारक होते तसे तात्काळ तयार करून द्यावे अशी मागणी देखील पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक अमर गाडे यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल तोंडावरच केली.कालच हा प्रकार आम्ही बांधकाम विभागाचे अभियंता साळुंखे यांना सांगितला होता.ठेकेदाराने काल फरश्या काढण्याचे काम चालू केले.आम्हाला लगेच कळाले,मी लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला.सूर्यवंशी म्हणाले की, आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही पाडणार आहे.आम्ही स्पष्ट सांगितले आम्ही मालोजीराजांचे स्मारक पाडू देणार नाही.फार तर दुसरे स्मारक बांधून द्या तर चला हात लावा.
असे सांगितले असताना देखील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे साळुंखे सोमवारी येतो म्हणून आम्हाला सांगितले मात्र सोमवार पर्यंत काम बंद ठेवा असे आम्ही विनंती केली तरी देखील काम चालू ठेवले आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता साळुंके मिली भगत आहेत असा थेट आरोप केला.बांधकाम विभागाने हे स्मारक ज्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.
यावेळी अभियंता साळुंखे म्हणाले की संबंधित विभागाने या स्मारकाला धक्का लागून न देण्याचा आम्हाला शब्द दिला होता.तरी देखील हा प्रकार झाला आहे त्यांनी आमच्या विभागाची परवानगी घेतली नाही अशी उपस्थितांना माहिती दिली.