Asian Marathon Championships 2024 : भारताच्या मान सिंगने रविवारी हाँगकाँग, चीन येथे 2 तास 14 मिनिटे आणि 19 सेकंद (2:14:19) च्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले.
34 वर्षीय भारतीय मॅरेथॉन धावपटूने पुरुषांच्या स्पर्धेत चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना येथील धावपटू हुआंग योंगझेंगचा 65 सेकंदांच्या फरकाने सहज पराभव केला. किर्गिझस्तानच्या तियापकिन इल्या याने 2:18:18 च्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय, एपी बेलियाप्पा 2:20:20 च्या वेळेसह सहाव्या स्थानावर राहिला.
आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये चार भारतीय धावपटूंनी भाग घेतला. महिलांच्या स्पर्धेत भारताच्या अश्विनी जाधव 2:56:42 च्या वेळेसह आठव्या स्थानावर राहिली. ज्योती गवते 3:06:20 वेळ नोंदवून 11व्या स्थानावर राहिली. पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी महिला मॅरेथॉनसाठी प्रवेश मानक 2:26:50 आहे.
🏆🏃♂️Victory Alert!
🇮🇳’s Man Singh is the Asian Marathon CHAMPION 👏👏
Clocking an impressive time of 2:14:19 in 🇭🇰. He has rewritten history 🌍 by becoming only the 2nd Indian to win the Asian Marathon Championship 🔥Let’s celebrate this incredible achievement and show some… pic.twitter.com/X3Ha1tOec7
— SAI Media (@Media_SAI) January 21, 2024
दरम्यान, मान सिंगचा मागील वैयक्तिक सर्वोत्तम 2:16:58 होता, जो त्याने मुंबई मॅरेथॉन 2023 मध्ये केला होता. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारताचा राष्ट्रीय विक्रम शिवनाथ सिंगच्या नावावर आहे, ज्यांने 1978 मध्ये जालंधर येथे 2:12:00 वेळ नोंदवली होती. पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी, पुरुषांच्या मॅरेथॉनमधील प्रवेश मानक वेळ 2:08:10 अशी आहे.