केडगाव- खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयाची अकरावी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी हर्षदा वरुडकर हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य हिंदुराव जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या खेळासाठी तिला मार्गदर्शन करणारे उपशिक्षक शांताराम कदम यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब सरतापे, राजेंद्र जगताप, मानसिंग रुपनवर, अनिल माखर आणि हनुमंत थोरात उपस्थित होते.