वॉशिंग्टन – अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून देण्यात आलेली उमेदवारी कमला हॅरिस यांनी आज अधिकृतपणे स्वीकारली. ही उमेदवारी मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णिय भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतृत्व हे अपयशी नेतृत्व असून यामुळे जीव आणि रोजगाराचेही नुकसान झाले आहे. असे त्यांनी आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात म्हटले आहे.
दोन्ही मुलींना नागरिकांनी केलेल्या संघर्षाबाबत आपली जाणीव आणि दयाभावना जागृत ठेवण्यासच सांगितले आहे. न्यायासाठीचा संघर्ष आणि जबाबदारीतील सहभागावरही विश्वास ठेवण्यास मुलींना सांगितलेले आहे. इतरांची सेवा केल्यानेच आयुष्याला हेतू प्राप्त होतो, असे मलाही माझ्या आईने शिकवलेले आहे, असे सांगून हॅरिस यांनी आपल्या आईचेही स्मरण केले.
3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन आणि हॅरिस हे दोघेही रिपब्लिकन उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष माइक पेंस यांना आव्हान देतील.