अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएलने मिस युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे. मिस युनिव्हर्सचा मुकुट घातल्यानंतर गॅब्रिएलच्या आनंदाला थारा नाही. जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आर बोनी गॅब्रिएलचा मुकुट भारताच्या हरनाज संधूने घातला, जी मिस युनिव्हर्स 2021 होती. यावेळी मिस युनिव्हर्सच्या मंचावर हरनाज खूपच भावूक दिसली.
दरम्यान, मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकल्यानंतर, हरनाज संधू पुन्हा एकदा त्या मंचावर चालत आली. मिस युनिव्हर्स म्हणून हरनाज संधूची ही शेवटची वाटचाल होती. अशात ती खूप भावूक झाली. हरनाज मिस युनिव्हर्सचा मुकुट घालण्यासाठी मंचावर येताच तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हरनाजला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
हरनाज संधू रॅम्प वॉक करतांना हरनाजचे भाषणही वाजत होते. तिने भाषणाच्या शेवटी ‘नमस्ते युनिव्हर्स’ म्हणताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सध्या सोशलवर तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हरनाज सुंदर काळ्या ड्रेसमध्ये मिस युनिव्हर्स 2022 कार्यक्रमात पोहोचली. हरनाजने डीप नेक ड्रेस परिधान केला होता. तिने चमकदार काळ्या ड्रेससह स्मोकी आय मेकअप केला. तिने ग्लोइंग न्यूड लिपस्टिकने तिचा मेकअप केला. मऊ खुल्या कुरळ्या केसांमध्ये हरनाज खूपच सुंदर दिसत होती. सर्वांच्या नजरा हरनाजच्या जबरदस्त लुकवर खिळल्या होत्या.