शिक्रापूर, (वार्ताहर)- तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील पिंगळेवस्ती येथे राहणाऱ्या महिलेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनिता वाघमारे या महिलेचा पती पोपट वाघमारे हा महिलेचा वारंवार काही ना काही कारणाने छळ करत असल्याने महिलेने त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
पोपट याने महिलेला दमदाटी करीत मारहाण करुन तू माझ्यावर केस केली, तशी तुझ्या आई वडिलांसह भावावर केस कर आणि वडिलांकडून मालमत्तेमध्ये हिस्सा माग असे म्हणून पोपटने महिलेला मारहाण केली.
त्यामुळे महिलेचे आई वडील व भाऊ पोपटशी चर्चा करण्यासाठी आलेले असताना पोपटने त्यांना देखील दमदाटी करीत शिवीगाळ केली. याबाबत याबाबत वनिता पोपट वाघमारे (रा. पिंगळेवस्ती तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पोपट अर्जुन वाघमारे याच्याविरुद्ध महिलेच्या छळासह मारहाण, शिवीगाळ, दमदाटीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.