शिक्रापूर (वार्ताहर)- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी मनोहर परदेशी (शिक्रापूर), कार्याध्यक्षपदी प्रा. कुंडलिक कदम तर उपाध्यक्षपदी आकाश भोरडे (निमगाव म्हाळुंगी) यांची निवड करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे येथे मसापची पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी परदेशी, कार्याध्यक्षपदी कदम यांची तर उपाध्यक्षपदी भोरडे, संभाजी चौधरी, शरद रणदिवे, कोषाध्यक्षपदी लेखक शेखर फराटे, सह कोषाध्यक्षपदी संभाजी गोरडे, कार्यवाहपदी सचिन बेंडभर, सहकार्यवाहपदी मयुर करंजे, राहुल चातुर, सल्लागारपदी भरत दौंडकर, शंकर नऱ्हे, नानासाहेब गावडे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यपदी संजीव मांढरे, विठ्ठल वळसे पाटील, बाबा इनामदार, शहाजी वाघमारे, रमेश भुजबळ व स्वप्निल महाजन यांची एकमताने निवड केली. डॉ. मिलिंद भोसुरे व संभाजी तळेकर यांनी नवीन सभासदत्व स्वीकारले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून बालसाहित्य संमेलन, कविसंमेलन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन राज्यातून नवोदित लेखकांचे पुस्तके मागवून परीक्षण करून उत्कृष्ट लेखकांचा सन्मान करणार असल्याचे अध्यक्ष परदेशी व कार्याध्यक्ष प्रा. कदम यांनी सांगितले.