पिंपरी – अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2010 पासून 19 सप्टेंबर 2020 या कालावधीत चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे घडली आहे.
पती मिलिंद भिमाजी वडेर, दीर शैलेश भिमाजी वडेर, सासू नीलिमा भिमाजी वडेर, सासरा भिमाजी आत्माराम वडेर (सर्व रा. चापेकर चौक, चिंचवडगाव) आणि रोहिणी संजय खराटे (रा. निंबाळकर आळी, चिंचवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी पती मिलिंद याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाला फिर्यादी विवाहितेने विरोध केला. तसेच त्या महिलेला कामावरून काढून टाकले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विवाहितेचा छळ केला. लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी फिर्यादीला घरगुती कारणांवरून तसेच तू खालच्या जातीची आहे, असे म्हणून सतत शिवीगाळ व मारहाण केली. पती मिलिंद याने माहेरहून पैसे आणण्यावरून तसेच महिलेला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून “तू घर सोडून जा, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे’ असे म्हणून विवाहितेला त्रास दिला.