PM Kisan Yojana Installment : ऐन दिवाळीमध्ये केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Good News for Farmenrs) बातमी देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 15 वा हफ्तालवकरच बळीराजाच्या खात्यात जमा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केले नसेल तर, ते करणे आवश्यक असल्याचेही म्हटले गेले आहे.
मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता दिवाळी संपल्यानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली होती. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार,” पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 ला देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.