पंजाब : सतत अपघाताच्या घटना घडत असल्याचे आपण ऐकत आहोत. अनेक ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातामुळे लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र तब्बल 100 वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला झाल्याची घटना समोर आली आहे. पंजाबच्या लुधियाणामधील खन्ना येथे हा अपघात झाला आहे. येथील धुक्यांमुळे सुमारे 100 वाहने एकमेकांना धडकल्याचे म्हंटले जात आहे. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताचं कारण धुके असल्याचे सांगितले जात असून दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही रुग्ण गंभीर असून त्यांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Punjab | Several people were injured after multiple cars collided with each other on the Bathinda-Chandigarh National Highway
SHO, Ravindra Singh says, “A car was coming from the Bathinda side and it hit four other cars going towards the Bathinda side. The injured have been… pic.twitter.com/l782nyXptS
— ANI (@ANI) July 30, 2023
धुक्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 20-25 किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या.
या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती.प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. परंतु यात एकाचा मृत्यू झाला असून जखमी रुग्णांवर उपचार केले जात आहे.