पुणे – देशभरात आज मकर संक्रांती सण उत्साहात साजरा करण्यात आला. मग यात सेलिब्रिटी देखील कशी बरे मागे राहतील. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टीने खास मराठमोळ्या अंदाजात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पा शेट्टीने नुकताच हा व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
इतकंच करून या दोघी थांबल्या नाहीत. तर त्या या शुभेच्छा देत त्यांनी अंतरंगी डान्स देखील करताना दिसत आहे. ज्यावर त्या स्वत:च मनसोक्त हसताना आणि याचा आनंद घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या योगाचे व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ तसेच आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ देखील ती टाकत असते. ती सर्व सणांना छान नटून थटून देखील व्हिडिओ बनवत असते. मागे तिने गुढीपाडव्याला देखील खास मराठमोळ्या अंदाजात नटून व्हिडिओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
शमिताविषयी बोलायचे झाले तर ती गेल्या काही काळापासून रूपेरी पडद्यापासून थोडी दूरच आहे. मात्र, आपल्या कुटुंबासोबतचे, मित्र परिवारासोबतचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram