आपल्या चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणारा अभिनेता विकी कौशल, आज त्याचा खास दिवस (वाढदिवस) साजरा करत आहे. विकी कौशल आज म्हणजेच 16 मे रोजी 34 वर्षांचा झाला आहे. विकी कौशलने फार कमी वेळात मोठे स्थान मिळवले आहे. पण एक काळ असा होता जेव्हा विकीला इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी अनेक वर्षे ठेचा खाव्या लागल्या. विकी हा प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक शाम कौशलचा मुलगा आहे आणि त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे, पण एक वेळ अशी होती जेव्हा विकीच्या वडिलांना बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला होता.
विकी कौशल चाळीत राहत होता-
विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितले होते की, आज ज्या ठिकाणी पोहोचलो त्याआधी त्याने अनेक संघर्ष पाहिले आहेत. विकीचे वडील शाम कौशल हे देखील फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, ते प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ग्लॅमरच्या दुनियेत नाव कमावण्याआधी विकीच्या कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट होती. एक काळ असा होता जेव्हा त्यांचे कुटुंब लहानशा चाळीत राहायचे.
अभियांत्रिकीनंतर बॉलीवूडमध्ये पाऊल –
तुमचा आवडता कलाकार विकी कौशल हा इंजिनियर होता हे फार कमी लोकांना माहीत असेल. बीटेकची 4 वर्षे पूर्ण केल्यानंतर विक्की कौशलने 2012 मध्ये फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले.
अशाप्रकारे सुरू झाले बॉलिवूड करिअर –
विक्की कौशलने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्याने छोटी भूमिकाही साकारली होती. यानंतर त्याला 2015 मध्ये ‘मसान’ चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
विकी कौशलचे चित्रपट –
विक्की कौशलने केवळ 10 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत ‘जुबान’, ‘रमन राघव 2.0’ उरी – द सर्जिकल स्ट्राइक, मनमर्जियां, संजू, सरदार उधम सारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. या चित्रपटांसाठी विकीला जवळपास 15 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
विकी कौशल नेट वर्थ:
caknowledge.com नुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 3 मिलियन डाॅलर आहे. भारतात ही रक्कम 22 कोटींच्या आसपास आहे. विकी कौशल दरवर्षी 3 कोटी रुपये कमावतो. विकी कोशल सध्या प्रत्येक चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो.
विकीला आलिशान गाड्यांचा शौक –
विकी कौशलकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स 5, याशिवाय त्याच्याकडे आलिशान घर आहे. ज्यामध्ये ते आनंदाने राहतात.
विकी कौशलचे आगामी चित्रपट –
विकी सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तो शशांक खेतानच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तो मेघना गुलजारच्या ‘साम बहादूर’ या चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय तो ‘इमॉर्टल ऑफ अश्वथामा’ आणि ‘लुका छुप्पी 2’ मध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.