मुंबई – सिनेसृष्टीचे प्रसिद्ध गायक ‘शंकर महादेवन’ यांनी काही वर्षांपूर्वी संगीत क्षेत्रात ‘ब्रेथलेस’ ही नवी संकल्पना आणली आणि ती फार हिट देखील ठरली. त्यांचं हे ‘ब्रेथलेस’ गाणं आज देखील सुपर हिट आहे.
यानंतर आता शंकर महादेवन पुन्हा एकदा एक ब्रेथलेस गाणं घेऊन येणार आहेत. स्वतः शंकर महादेवन यांनी क्रु अॅपद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. यावेळी शंकर महादेवन ‘ब्रेथलेस’ हनुमान चालिसा गाताना दिसणार आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओत ते म्हणाले… ‘तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की मला लवकरच अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणं मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे..
‘या गाण्याचा गातानाचा वेग फार जास्त आहे. तसेच त्यातील काही शब्द हे कठीण आहे. हनुमान चालिसाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात विविध महत्त्व आहे. यामुळे आपल्याला चांगले फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ऐका’. असं शंकर महादेवन म्हणाले आहे.