Weather Update – दोन दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता आणखी दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. एवढेच नव्हे तर काही जिल्ह्यांत गारपिटीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील उर्वरित भागांत तापमानाचा पार वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. तसेच विदर्भात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज वर्तविला जात आहे.
हवामान खात्याने बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपिटीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित भागांत उन्हाचा चटका
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वाशीम येथे पारा 39 अंशांपार कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असला तरी तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. त्यातच पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता आहे.