Lok Sabha Election 2024| अभिनेत्री कंगणा रणावतला भाजपकडून मंडीतून लोकसभा निवडणूकीसाठी रिंगणात उतरवले आहे. यानंतर तिने प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. मात्र कंगणाविरोधात कोण निवडणूक लढवणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर विक्रमादित्य सिंह काँग्रेसच्या वतीने मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने 16 उमेदवारांची आणखी एक यादी शनिवारी जाहीर केली आहे.
या यादीत काँग्रेसने पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेशातील दोन आणि ओडिशातील 9 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय गुजरातमधील पाच जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 12 यादीत 247 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
Lok Sabha Elections 2024 | Congress releases another list of 16 candidates for the general elections.
Vikramaditya Singh to contest from Mandi (against BJP candidate Kangana Ranaut), Manish Tewari from Chandigarh. pic.twitter.com/jIGHjjD5ql
— ANI (@ANI) April 13, 2024
कोण आहेत विक्रमादित्य सिंह ? Lok Sabha Election 2024|
हिमाचल प्रदेशचे PWD मंत्री विक्रमादित्य सिंह हे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि मंडीचे विद्यमान खासदार प्रतिभा सिंह आहेत. शिमला विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विक्रमादित्य सिंह आमदार राहिले आहेत.
विक्रमादित्य सिंह यांना मंडी लोकसभा मतदारसंघासाठी नवीन नाहीत, कारण त्यांचे वडील आणि आई दोघांनीही ही जागा प्रत्येकी तीनदा जिंकली आहे. 2021 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत विक्रमादित्यने त्यांची आई प्रतिभा सिंह यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. Lok Sabha Election 2024|
हेही वाचा:
पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील, तर एकालाच ‘इलेक्शन ड्यूटी’; निवडणूक आयोगाचा ‘मोठा निर्णय’