पिंपळे गुरव -ह क्षेत्रीय कार्यालयात घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेच्या अध्यक्षस्थानी सह शहर अभियंता संजय कुलकर्णी होते. या वेळी क्षेत्रीय कार्यालयातील 120 नागरिकांनी आपले तक्रार अर्ज भरून दिले. या तक्रारींमध्ये मुख्यत्वे नागरिकांनी आपल्या भागात कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत याची तक्रार जनसंवाद सभेत दाखल केली. त्यामुळे बहुतांश तक्रारी या पाणी, ड्रेनेजलाइन त्यांच्या काही समस्या त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी ही त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
तर काही तक्रारींवर काम सुरू आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून लगेच येथील समस्या सोडविण्यासाठी सूचना करण्यात आल्या. यामुळे नक्कीच नागरिकांना ज्या समस्या आपल्या प्रभागात जाणवत आहेत त्यांचे या संवाद सभेतून निरसन करण्याचा प्रयत्न व कुठे कुठे काय काय आहे व नागरिकांना कोण कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते हे जाणून घेण्याचा प्रयत्न यातून केला गेला.
नागरी समस्यांवर जनसंवादमधून नागरिकांशी संवाद साधला. त्यातून नागरिकांना कोणकोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज मुख्य करून ड्रेनेजलाइन, पाणी समस्या, गार्डन समस्या व इतरही काही समस्यांवर चर्चा झाली. काही समस्या सोडविल्या आहेत. काही समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे, ह क्षेत्रीय कार्यालय अधिकारी विजय थोरात यांनी सांगितले.