वाघाचा रस्ता अडवल्याने जिप्सी चालक आणि गाईड निलंबित

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील घटना

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आज मटकासूर नावाच्या वाघाचा रस्ता अडविला असता वाघ चांगलाच चवताळून उठला. यामुळे जिप्सी मधील पर्यटक घाबरले. या प्रकरणी जिप्सी चालकव गाईडला निलंबित केले आहे.

ताडोबात वाघाचे दर्शन होत आहे. आज बुधवारी सकाळी पर्यटक सफारीचा आनंद घेत असताना हिलटॉप परिसरात एका ठिकाणी जिप्सी समोर मटकासूर नावाचा वाघ आला. जिप्सी अचानक समोर आल्याने वाघ चवताळून उठला. या प्रकारामुळे पर्यटक घाबरले. यावेळी वाघ बराच वेळ तिथे होता.

वाघाला बघण्यासाठी म्हणून पर्यटकांनी  रस्ता अडवून धरला. या संपूर्ण घटनाक्रमचे चित्रीकरण समाजमाध्यमावर व्हायरल झाले. दरम्यान या प्रकरणी जिप्सी चालक व गाईडवर निलंबनची कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.