जान्हवी कपूर आपल्या अभिनय अदाकारीमुळे सिनेसमीक्षकांसह सर्वांच्याच प्रशंसेस पात्र ठरली आहे. तसेच जान्हवीचा फॅशन सेन्सही अत्यंत चांगला आहे. तसेच दररोज जिम्नॅशियममध्ये जाऊन घाम गाळणे हा तिच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे तिचा फिटनेस जबरदस्त आहे. पण पापाराजी मात्र तिचा जिम लूक टिपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. हे लक्षात घेऊनच जान्हवी नेहमीच आपला जिममधील लूक “जपण्यासाठी’ कायम सजग असते. याचे कारण जान्हवी म्हणते की, मी आतापर्यंत केवळ एकच चित्रपट केला आहे.
अन्य चित्रपटांचे केवळ शूटिंगच सुरू आहे. लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मला माझ्या चित्रपटांमुळे ओळखले जाईल. पण तोपर्यंत मला जिम लूकमुळेच ओळखले जावे असे मला वाटत नाही.’
एका मुलाखतीदरम्यान तिने हे मत मांडले आहे. “धडक’ हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर लोक मला भेटून तुझा चित्रपट आवडला असे सांगत असत. आता लोक मला येऊन आम्ही तुझा जिम लूक फॉलो करतो असे सांगतात. मला ते विचित्र वाटते, असे ती म्हणते.