Gyanesh Kumar Balwinder Sandhu । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने नवीन निवडणूक आयुक्तांची नावे निश्चित केली आहेत.
Ex-bureaucrats S S Sandhu, Gyanesh Kumar finalised as election commissioners: Panel member Adhir Chowdhury
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2024
ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू हे देशाचे पुढील निवडणूक आयुक्त असतील. या बैठकीला काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही उपस्थित होते. या बैठकीला केवळ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले,’त्यांना निवडणूक आयुक्तांसाठी 212 नावांची यादी देण्यात आली होती. मी आधीच यादी मागितली होती कारण जेणेकरून आम्ही तपासू शकू पण मला ती संधी मिळाली नाही. मला काल रात्री यादी देण्यात आली. इतक्या कमी वेळात इतक्या नावांची माहिती गोळा करणं मला शक्य नव्हते’
कोण आहेत ज्ञानेश कुमार?
-ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ज्ञानेश कुमार हे काही दिवसांपूर्वी सहकार मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत.
-याआधी ते गृहमंत्रालयात काश्मीर विभागाचे सहसचिव होते. याच काळात काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या तयारीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.यापूर्वी ही बैठक १५ तारखेला संध्याकाळी ६ वाजता होणार होती. मात्र त्याचे एक दिवस आधी आयोजन करण्यात आले होते. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने आणि शुक्रवारी अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त झाली होती.
हे वाचाल का ? ‘भाजपचा उमेदवारीमुळे …’ शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आरोप करत दिला राजीनामा