ज्ञानदीप लावू जगी : त्रैलोक्‍य जाणें

माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें। हें जगचि नोहे आघवें?। जैसें दूध मुरालें स्वभावें। तरि तेंचि दही।।

कां बीजचि जाहलें तरू। अथवा भांगरचि अळंकारू। तैसा मज एकाचा विस्तारू तें हें जग।।
हे अव्यक्तपणे विजलें। तेंचि मग विश्‍वाकारें वोथिजलें।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारले। त्रैलोक्‍य जाणें।।

संत ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञानेश्‍वरीच्या नवव्या अध्यायात म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला सागंताहेत, माझा विस्तार म्हणजेच हे विश्‍व होय. जसे दूध विरजले की, त्याचे स्वाभाविकपणे दही होते अथवा बीजाचा वृक्ष होतो, किंवा सुवर्णाचे अलंकार होतात; त्याप्रमाणे माझा विस्तार म्हणजेच जग. अव्यक्‍तपणे गोळा झालेले हे विश्‍व व नंतर विश्‍वाच्या आकाराने विस्तार पावलेले, अव्यक्‍त अमूर्त अशा माझ्याकडून हे त्रैलोक्‍य विस्तारले हे जाण.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.