54 रुग्णांचा मृत्यू : 2206 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – गेल्या 24 तासांत शहरात 2613 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात 2563 रुग्ण हे शहरातील असून 50 शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत आहेत. तसेच 54 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 32 रुग्ण हे शहरातील असून 22 रुग्ण शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत होते.
मंगळवारी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार दुपारी चार वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत शहरातील 2563 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे आतापर्यंत शहरातील एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 88 हजार 588 इतका झाला आहे. तसेच 2206 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. यामुळे आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्या शहरातील नागरिकांची संख्या 1 लाख 62 हजार 870 इतकी झाली आहे.
शहरात सध्या एकूण 23 हजार 274 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी रुग्णालयांमध्ये 8357 जणांवर उपचार सुरु असून त्यापैकी 1915 रुग्ण शहराबाहेरील असून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
पालिकेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार 54 करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 3512 इतकी झाली आहे. यात 2444 मृत्यू हे शहरातील नागरिकांचे झाले असून 1068 मृत्यू शहराबाहेरील नागरिकांचे शहरात उपचारा दरम्यान झाले आहेत.