ज्ञानदीप लावू जगी : हं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः

समो। हं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्‍त्या मयि तेषु चाप्यहम्‌ ।। 29:9 ।। 

श्रीभगवद्‌गीता (अध्याय 9, श्‍लोक 29)

सर्वसाधारणपणे आपण स्वतःला आवडणाऱ्या व्यक्‍तीसच जवळ ठेवतो. त्यामुळे भगवंतांची जवळीक साधण्यास आधी स्वतःचे वर्तन त्यांना आवडेल असे करायला हवे का? हा प्रश्‍न साधकाच्या मनात उद्‌भवू शकतो.

म्हणजे काय, तर निर्गुण भक्‍तीरूपी साधना सुरू करायच्या आधी आपणांस कुठलीतरी पूर्वतयारी करायला हवी का, या संदेहाचे निराकरण करण्यास भगवान वरील श्‍लोकातून त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, हे सांगितले आहे.

भगवान म्हणत आहेत की, मला सर्व लोक समान आहेत. ना मी कुणाचा द्वेष करतो, ना कुणी मला अधिक प्रिय आहेत. परंतु जे माझे भक्‍त आहेत त्यांनाच मी प्राप्त होतो. ते म्हणत आहेत की, आपण सध्या जसे आहोत तसेच्या तसे त्यांना स्वीकाराह्य आहोत.

त्यांच्या जवळ आपण पोहोचणार की नाही याबद्दलचा निर्णय ते घेत नाहीत, तर आपण स्वतःच भक्‍त आहोत का नाही यावर निर्णय घेत असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.