नवरात्रीनिमित्त तालिबानच्या राज्यात काबुलच्या मंदिरात किर्तन, जागरण?

काबुल: तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानात पसरलेल्या भीतीचे वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात झाली आहे. याचं ताजं उदाहरण राजधानी काबूलमध्येच पाहायला मिळालं. इथं नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर काबुलमध्ये हिंदू नागरिकांनी कीर्तन आणि जागरण केलं.

अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आलं आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात हा कार्यक्रम करण्यात आला.

अस्माई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्त काबुलच्या असमाई मंदिरात किर्तन, जागरण तर झालंच, शिवाय भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात गरीब लोकांना अन्नदान करण्यात आलं. या कार्यक्रमात दीडशेच्या वर लोक जमले होते. ज्यात बहुतांश हिंदू आणि शीख नागरिक होते. तालिबानकडून या कार्यक्रमात कुठलाही व्यत्येय आला नाही.

दरम्यान, अशरफ गनी सरकारमध्ये इथं सर्वकाही करण्यावर सूट होती. अमेरिकन सैन्य होतं, तोपर्यंत अल्पसंख्याक समुदायही अतिशय गुण्यागोविंदाने इथं राहात होता. अफगाणिस्तानात हिंदू आणि शिख अल्पसंख्यांक आहेत. मात्र, 15 ऑगस्टला जसं तालिबानने काबुलवर चढाई केली.

गनी देश सोडून पळाले, तसे इथल्या अल्पसंख्यांक समुदायाचे दिवसही पालटले. मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंवरही आता बंधनं घालण्यात आली आहे. मात्र, तरीही धर्मिक कार्यक्रम अजूनही सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या असमाई मंदिरात किर्तन, जागरणाचं आयोजन करण्यात आलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.