हडपसर येथे पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी मध्यरात्री हडपसर पोलिसांनी गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर पकडला. त्यामध्ये कंटेनरसह सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गेल्यावर्षी कोरोना निर्बंध लागू झाल्यानंतर शहरात छुप्या मार्गाने मोठ्याप्रमाणात गुटखा आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने नुकतेच निर्बंध लागू केल्यानंतर पहिल्याच रात्री कर्नाटकवरून गुटख्याने भरलेला हा कंटेनर शहरात येत होता. पोलिसांनी पंधरानंबर आकाशवाणी हडपसर येथील टेकवडे पंपावर गुटखा वाहतूक करणारा हा कंटेनर ताब्यात घेतला. ३५० गोण्यांमधून हा माल भरलेला आहे. हिरा कंपनीचा गुटखा व सुगंधीत तंबाखू यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.