वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी वडगावमधील संस्कृती कॉलनीमध्ये छापा घातला. यावेळी पोलिसांनी दोन लाख ५२ हजारांचा गुटखा जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ढोरे यांनी भाड्याने दिलेल्या पत्र्याचे शेडमध्ये मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी (वय २५) व अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक हे त्यांच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधित केलेला 2,52,000 रुपयांचा गुटखा मिळून आला.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत हा गुटखा सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी (वय 30) याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुटखा जप्त केला.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, अंमलदार नितेश कवडे, सुभाष शिंदे, गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे.