माळेगाव, (वार्ताहर)- माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” विषयावर कार्यशाळेचे आयोजन. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज ओळखून माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधील संगणक विभागाने एआयसीटीई -आयएसटीई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’ (AIML) या विषयावर नुकतीच आयोजित केलेली पाच दिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.
यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील व भारताबाहेरील जवळपास २०० प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेले संबंधित उद्योग क्षेत्रातील विषयतज्ञ तेजस रावळ यांनी मार्गदर्शन केले. कॉम्प्युटर विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. योगिता सिनकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यशाळेला आयएसटीईचे चेअरमन डॉ.प्रताप सिंह देसाई यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, प्राचार्य डॉ. शैलेंद्र मुकणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. वेदांतिका जगताप यांनी केले. यावेळी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप व संचालक मंडळ, विश्वस्त रवींद्र थोरात, वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, निमंत्रित सदस्या सीमा जाधव, चैत्राली गावडे तसेच संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.