वालचंदनगर, (वार्ताहर) -नारीशक्ति ग्रुप गेस्ट हाऊस येथे हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. हळदी कुंकु समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं
या कार्यक्रमाला आज उपस्थित राहून परिसरातील महिला भगिनींशी संवाद साधला.. हळदी कुंकु समारंभाच्या निमित्तानं महिला वर्गाचा एक स्नेहमेळावाच होत असतो. या निमित्तानं एकमेकांच्या भेटीगाठी होतात, संवाद होतो. नेहमीच्या कौटुंबिक जबाबदार्या आणि दगदग यात महिला वर्ग व्यस्त राहत असतो. त्यामुळे अशा भेटीगाठी त्यांच्यासाठी पर्वणी असते. आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.
अशावेळी ग्रामीण भागातील महिलांनीही मागे राहू नये. आपल्यातील कला कौशल्यांना वाव देऊन कुटुंबाला हातभार लावावा, अशी अपेक्षा यावेळी सविता डोंबाळे व्यक्त केली. पूजा अवधानी, नेहा माने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदींनी परिश्रम घेतले.