रोहटक – डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरूमीत राम रहिम सिंग यांनी आपल्याला शेती करण्यासाठी एक महिन्याचा पॅरोल मिळावा अशी मागणी केली आहे. दोन बलात्कार आणि एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात सध्या हे बाबा हरियाणाच्या रोहटक मधील कारागृहात आहेत. त्यांनी म्हटले आहे की आपली हरियानातील सिरसा जिल्हयात शेती असून सध्याच्या शेतीच्या हंगामातील कामे करण्यासाठी आपल्याला 42 दिवसांचा पॅरोल मिळावा. त्यांचा अर्ज जिल्हा प्रशासनाकडे विचारार्थ पाठवण्यात आला आहे.
या अर्जाचा विचार करण्यास हरकत नाही अशी शिफारस कारागृह अधिक्षकांनी केली आहे. त्यांचे कारागृहातील वर्तन चांगले असून त्यांनी कोणत्याही नियमांचे आत्तापर्यंत उल्लंघन केलेले नाहीं असेही कारागृह अधिक्षकांनी म्हटले आहे. गुरमीत राम रहिम हे सध्या 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत.