नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिवूड पटांच्या बायोपिकच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाचा समावेश होणार आहे.
तो चित्रपट म्हणजे, ‘गुल मकई’. नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला यूसुफजई हिच्यावर आधारीत ‘गुल मकई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे.
या चित्रपटातील जास्तीत जास्त दृश्यांची शुटिंग काश्मिरमध्ये करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अमजद खान असून संजय सिंगला हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
‘गुल मकई’मध्ये रीम शेख मलाला यूसुफजई हिची व्यक्तीरेखा साकरणार आहे. एवढचं नाहीतर या चित्रपटात दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांच्यासह दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी 31 जानेवारी, 2020 मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचा प्रदर्शित होणारा हा शेवटचा चित्रपट असणार आहे.