“रोटरी’च्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेतून युवकांना मार्गदर्शन

नगर – रोटरी क्‍लब अहमदनगर व रोटरी क्‍लब प्रियदर्शनी यांच्यातर्फे तरुणांसाठी व्यक्तीमत्त्व विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, बेंगलोर, सिंगापूर, श्रीलंका, नायजेरिया येथील 16 ते 23 वयोगटातील युवक सहभागी झाले होते.

रोटरी क्‍लब ऑफ कोयाकोट्टूम, रोटरी क्‍लब कोट्टायम व रोटरी क्‍लब रामनाड यांचे यासाठी सहकार्य लाभले. माजी प्रांतपाल डॉ. कोरिअचन यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीनेच या कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले.

टीम वर्क, टाईम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्कील, इंटरव्ह्यु टेक्‍निकल आदिंसह विविध महत्वपूर्ण विषयांवर सहभागी युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी नगरमधील रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनने शाळेतील सुसज्य कॉम्प्युटर लॅब संस्थेने उपलब्ध करुन दिली होती. नगरमधून यात 150 युवक सहभागी झाले होते रोटरी क्‍लब अहमदनगरचे अध्यक्ष ऍड. अमित बोरकर, रोटरी प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा, डॉ. बिंदू शिरसाठ, डॉ. स्वप्नील बडजाते आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.