कॉंग्रेसच्या सेवादलाने सामाजिक उपक्रम राबवावेत

आमदार डॉ. सुधीर तांबे; शहर सेवादलाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नगरमध्ये बैठक

नगर – शहर सेवादल कॉंग्रेसच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवावेत. या माध्यमातून शहरातील विविध समाज घटकातील काम करणाऱ्या व्यक्तींना कार्यकारिणी करताना संधी द्यावी, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

शहर सेवादलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कॉंग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, सेवादलाचे नूतन शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान शेख, विद्यार्थी आघाडीचे शहर-जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांच्यासह पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

आमदार तांबे म्हणाले, “”सेवादल कॉंग्रेस पक्षाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आघाडी आहे. सेवादलास स्वातंत्र्यपूर्व काळाचा मोठा इतिहास आहे. सेवादलाच्या माध्यमातून आजवर राज्य आणि देशपातळीवरती कॉंग्रेस पक्षाने अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत. आता समाजात कॉंग्रेस पक्षाचे विचार रुजविण्यासाठी सेवादलाने उपक्रम राबवावेत.” शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

सेवादलाचे शहर-जिल्हाध्यक्ष मनोज लोंढे यांनीही भूमिका मांडली. सेवादल आघाडीची लवकरच शहर जिल्हा कार्यकारणी गठित करून वरिष्ठांच्या जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले. मेजर रफिक शेख, ैशाली दालवाले, ंगीता पाडळे, उषाताई भगत आदी यावेळी उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.